वारंवार विचारले
जाणारे प्रश्न
विभाग निहाय
विभाग-केंद्रित कार्यक्रम कशासाठी?
एखादा विभाग-केंद्रित प्री-सीड प्रोग्राम हा त्या विभागांमधील संस्थापकांसमोर जी विशिष्ट आव्हाने येतात त्यांसाठी तयार केला जातो. या दृष्टिकोनामुळे आम्हाला विषयावर प्रचंड रोख असलेली तज्ज्ञांची सत्रे तयार करण्यासाठी, संबंधित ग्राहक बैठकांची व्यवस्था करण्यासाठी आणि एकच उपाय प्रत्येक ठिकाणी लागू होतो हा विचार बाजूला ठेवून प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र आवश्यकतांसाठी साजेसे नेमके लाभ उपलब्ध करून देण्यासाठी मदत होते.
मला कुठल्या वेगवेगळ्या विभागांसाठी अर्ज करता येऊ शकेल?
Atoms 4.0 AI आणि भारत साठी अर्ज स्वीकारत आहे.
मी या विभागांतर्गत येत नसेन तरीही मला Accel Atoms साठी अर्ज करता येईल का?
Accel Atoms मध्ये अर्ज करण्यासाठी सर्व विभागांतील स्टार्टअप्सचे स्वागत आहे. आम्ही Atoms 4.0 साठी AI आणि Bharat मध्ये स्टार्टअप्स शोधत असताना,या 2 विषयांपैकी एकाशीही तुमचा संबंध नसेल तर, तुमचा अर्ज Accel वर योग्य सदस्यांकडे पाठवला जाईल. Accel ही एक विभाग-निरपेक्ष VC संस्था आहे.
कार्यक्रम रचना
समूहाचे स्वरूप कसे असेल आणि कालावधी काय असेल?
प्रत्येक समूह त्याच्या प्रोग्राम शेड्यूलमध्ये वेगळा असतो, कारण त्यांमध्ये वेगवेगळ्या विभागांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि Accel मधील वेगवेगळे भागीदार ते समूह चालवतात. आणखी माहितीसाठी कृपया समूहाची पृष्ठे पहा.
मला Accel Atoms वर कसा अर्ज करता येईल?
Accel Atoms वर अर्ज करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आमच्या संकेतस्थळाच्या माध्ममातून अर्ज करणे. आमच्याकडे यासाठीच काम करणारे एक पथक आणि एक स्वयंचलित प्रक्रिया आहे, ज्यामुळे आम्हाला कुठल्याही अर्जाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी मदत होते. तुम्हाला कोणी आमचा संदर्भ दिला असेल तर, तुम्ही अर्ज भरावा असे आम्ही तुम्हाला सुचवतो.
किती स्टार्टअप्सची निवड केली जाईल?
Accel Atoms च्या या भागात आम्ही प्रत्येक समुहातील 5-10 कंपन्यांबरोबर भागीदारी करण्याचा विचार करत आहोत. कार्यक्रमादरम्यान सर्वाधिक प्रगती करणारे स्टार्टअप $1 दशलक्ष गुंतवणुकीसाठी पात्र ठरतील.
मला कोणते लाभ प्राप्त होतील?
Accel कुटुंबाचा भाग म्हणून, कंपन्यांना आमच्या नेटवर्क भागीदारांकडून $5M पेक्षा जास्त किमतीचे 70+ लाभ प्राप्त होणार आहेत.
Accel Atoms कार्यक्रमाचे प्रमुख घटक कोणते आहेत?
समुदाय: 300+ स्टार्टअप संस्थापक, 100+ देवदूत गुंतवणूकदार आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उद्योग तज्ज्ञांच्या Accel च्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवा.Gain access to Accel’s network of 300+ startup founders, 100+ angel investors and industry experts to guide you.
ग्राहक: Accel तुमच्यासाठी सर्व उद्योगांमधून सुरुवातीचे ग्राहक आणि अंतिम ग्राहक शोधण्याची प्रक्रिया सोपी करते. Accelच्या 200+ स्टार्टअप्सच्या पोर्टफोलिओच्या नेटवर्कमधून उद्योग क्षेत्रात संपर्क निर्माण करा , उद्योग संपर्क सक्षम करा आणि तुमच्या कल्पनेला आकार देण्यासाठी प्लेबुकमध्ये प्रवेश मिळवा..
1:1 मार्गदर्शन: AI आणि भारत मधील उद्योग तज्ज्ञांबरोबर मास्टरक्लास, तसेच गरजेनुसार मिळणारी फलिते आणि समूह संस्थापकांच्या मदतीने तयार केलेली प्रगतीची योजना
पात्रतेचे निकष
Accel Atoms मध्ये अर्ज करण्यासाठी माझी कंपनी कुठल्या स्तरावर असली पाहिजे?
आम्हाला प्री-सीड टप्पयावरील कंपन्यांना मदत करायची आहे ज्यांची $2M पेक्षा कमी प्रगती झाली असेल. आधीच्या समूहांमध्ये, आम्ही कल्पनेचा टप्पा आणि आणि प्री-प्रॉडक्ट कंपन्यांसह वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. आम्ही Atoms 4.0 मधील सर्व टप्प्यांवरील कंपन्यांना मदत करत राहू.
अर्ज करण्यासाठी मी विचारप्रक्रियोतील कुठल्या टप्प्यावर असले पाहिजे?
कल्पनेच्या टप्प्यापासून $1M पर्यंत कमाई करणाऱ्या स्टार्टअपपर्यंत Accel Atoms कार्यक्रम संबंधित आहे
आम्ही कुठल्याही MVP मधील सुरुवातीच्या टप्प्यातील उदयोन्मुख कल्पनांमध्ये आणि आपल्या कंपनीची उभारणी करण्यासाठी पूर्णवेळ देण्याकरिता वचनबद्ध आहेत अशा संस्थापकांसाठी .गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत,
मी एकटा संस्थापक आहे. मला अर्ज करता येईल का?
हो, तुम्ही एकमेव संस्थापक असलात तरी तुम्ही अर्ज करू शकता. आम्ही Atoms मध्ये गुंतवणूक केलेल्या एकमेव संस्थापक कंपन्यांमध्ये ब्रिक, रेपिक आणि स्कूब यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून सहभागी होण्याची परवानगी आहे का?
AI ग्रुपसाठी, आम्ही भारतातील संस्थापक आणि जगभरात कोठेही असलेल्या भारतीय वंशाच्या संस्थापकांकडून अर्ज स्वीकारत आहोत. भारत समूहासाठी, आम्ही भारतातील संस्थापकांकडून अर्ज स्वीकारत आहोत.
वित्तसहाय्य
Atoms किती भांडवलाची गुंतवणूक करेल?
आम्ही निवडक स्टार्टअप्समध्ये $1M पर्यंत गुंतवणूक करू. अधिक निधी उभारू पाहणाऱ्या स्टार्टअप्ससाठी, आम्ही Atoms कार्यक्रमाच्या बाहेर Accel गुंतवणुकीसाठी त्यांचा विचार करू
अनुदान किंवा इक्विटी गुंतवणूक म्हणून वित्तसहाय्य दिले जाते का?
कार्यक्रमाच्या शेवटी Atoms इक्विटी किंवा रूपांतर करण्यासारख्या नोटांच्या स्वरूपात $1 दशलक्ष पर्यंत गुंतवणूक करेल.
Atoms कडून स्वीकार होणे याचा अर्थ Accelकडून गुंतवणूक प्राप्त होणे असा होतो का?
Atoms ची रचना $1 दशलक्ष गुंतवणूक आणि नेटवर्कच्या लाभांसह संस्थापकांना 0 ते 1 पर्यंत नेण्यासाठी केली आहे. आम्ही आमच्या समूहांमधील स्टार्टअप्सच्या प्रगतीचे सतत मूल्यमापन करतो आणि त्यांच्या मार्गक्रमणानुसार, फॉलो-ऑन राउंडसाठी त्यांचा विचार करतो किंवा इतर गुंतवणूकदारांना भेटण्याच्या संधी खुल्या करतो.